Welcome To Marathi Department
'ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक'
'पुरंदरचे भूषण आचार्य अत्रे '
'संत सोपानदेव महाराज'
मराठी विभागाविषयी
मराठी भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास करण्याचे उद्दीष्ट असलेल्या मराठी विभागाची स्थापना महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९७२ पासूनच झाली. या विभागात पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी, त्यातून सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक मूल्य रुजववावीत या हेतूने हा विभाग सुरू झाला. मराठी विभागाने आतापर्यंत विविध साहित्यिक उपक्रम राबविले आहेत. त्यात साहित्यिकांची व्याख्याने, चर्चासत्र, साहित्य संमेलन, पुस्तक प्रदर्शन, मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग असे अनेक उपक्रम राबविले जातात. या विभागातून शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विभागातील प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी यांच्यात विशेष नाते प्रस्तापित झाले आहे. पुरंदर तालुक्यातील परिसरासाठी मराठी विभाग भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करणारे एक केंद्र ठरत आहे.